विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजनाळ - पंजाब इलाखा-अमृतसर जिल्ह्यांतील एक तहशील. उ. अ. ३१० ३७' ते ३२० ३' व पू.रे.७४० ३०' ते ७४० ५९'. क्षेत्रफळ ४१७ चौरस मैल.
तहशिलच्या दक्षिणेकडील प्रदेशांस बारीदोआब कालव्याचें पाणी मिळतें. तहशिलीची जमीन साधारण कमी दर्जाची असल्यामुळें लागवडीचें प्रमाण कमीच आहे.
या तहशिलींत ३३१ खेडीं असून अजनाळ हें मुख्य आहे. जमीनमहसुली व इतर कर मिळून एकंदर उत्पन्न इ. स. १९०३-४ सालीं ३६१००० रुपये होतें. [ इ. गँ ]