विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अन :- लोअर बर्मा. क्याकपा जिल्ह्यांतील टाऊनशिप उ. अ. १९० १६' ते २०० ४०' व पू. रे. ९३० ४५' ते ९४० २६'. क्षेत्रफळ १८६१ चौरस मैल १९०१ सालीं यांत ३५३ खेडीं होतीं. लोकसंख्या सुमारें तीस हजार. या भागांत जंगल बरेंच आहे. इ. स. १९०३-४ सालीं ३९ चौरस मैलांत लागवड केलेली होती. अन हें मुख्य ठिकाण अन नदीच्या कांठीं वसलें आहे. ( इं. गॅ. ५. )