विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंत बडवे - अठराव्या शतकांच्या उत्तरार्धांत हा कवि होऊन गेला. हा कवि प्रल्हादबुवांचा नातू होय. यानें आपल्या आजापासून कवित्वशक्ति उचललेली दिसते. यानें आपल्या गुरूवर गोपाळष्टक नांवाचे जें कवन रचिलें आहे तें फार मधुर आहे. यानें लिहिलेले ग्रंथ :- (१) मल्हारी माहात्म्य ( ओंव्या १३८ ); (२) श्रीमद्भागवताच्या पंचमस्कंधांतील भरताख्यान ( ओंव्या १०२ ); ब्रह्मोत्तर खंडाच्या आधारानें लिहिलेलीं (३) शिवरात्रीमहात्म्य ( ओंव्या ७३ ) व (४) प्रदोष-महात्म्य ( ओंव्या ७५ ) या खेरीज कांहीं स्फुट पदेंहि आहेत. [ सं. क. का. सू. महाराष्ट्र कविचरित्र ]