विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अच्युताश्रम - हे स्वत:स चिदानंदानुचर म्हणवितात. यावरून यांचे गुरु चिदानंद. यांचे शिष्य गोपाळ याज्ञवल्की (कृष्णयाज्ञवल्कीचे पुत्र) यांचे विनंतीवरून शिवकल्याणांनीं श्री अभनुवामृत टीका रचिली (१५५७). तेव्हां हे शिवकल्याण समकालीन किंवा किंचित् तत्पूर्वी होऊन गेले. ग्रंथ-भगवद्‍गीता ( १६१४ ? ) ब्रह्मकथा. रामवोविया. ( सं. क. का. सू. )