विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अका जात - या जातीचे लोक तेझपूरचे उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत राहत असून त्यांची एक लहान पण स्वतंत्र राष्ट्र जाति बनली आहे. ह्या लोकांचा डालामिरिस व अबोर लोकांशी फार जवळचा व निकट संबंध असावा असे कर्नल डाल्टन यांचें मत आहे; परंतु त्या लोकांपेक्षां अका जातीचे लोक दिसण्यांत फार भिन्न दिसतात. (इं.गॅ.५ खानेसुमारी)