विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकालगड - पंजाब. गुजराणवाला जिल्हा. वझिराबाद तहशिल. नॉर्थ-वेस्टर्न रेलवेच्या वझिराबाद-लायलपूर लाईनवर हें सुमारें पांच हजार लोकवस्तीचें एक गांव आहे. उ.अ. ३२. १६ पू. रे. ७३. ५०. इ. स. १८६७ सालापासून येथें म्युनसिपालिटी असून तिचें उत्पन्न सरासरी सहा सात हजार असतें. या गांवास व्यापारी महत्व मुळींच नाहीं. शीख अमलाच्या अखेरीस सावनमल आणि त्याचा पुत्र मूळराज हे मुलतानचे सुभेदार होते. त्यांच्या घराण्यांतील लोक येथे अद्यापि राहतात. (इं. गॅ.५ )