विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अक्वा - 'अफगाण तुर्कस्तान' मधील याच नांवाच्या जिल्ह्याचें मुख्य गांव. उ. अ. ३६० ५५' व पू. रे. ६६० १०'. समुद्रसपाटीपासून उंची १०८८. या गांवास तटबंदी असून किल्लाही आहे. येथें अफगाण शिबंदी असते. उन्हाळ्यांत येथील हवा रोगट असते. येथें बराच मोठा व्यापार चालतो. बुखार्याचे कारवान येथें व्यापाराकरतां येत असतात. (इं.ग्या.५)