विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकबरपुर -
तहशील. संयुक्त प्रांत. कानपुर जिल्ह्यांतील एक तहशील.  उ.अ.२६  १५' ते २६ ३३' पू.रे. ७९ ५१' ते ८० ११' क्षेत्रफळ २४५ चौरस मैल.  लोकसंख्या सुमारें एक लक्ष आठ हजार.  या तहशिलींत १९९ खेडीं, व अकबरपुर हा एक सुमारें पांच हजार लोकवस्तीचा गांव आहे.  एकंदर उत्पन्न इ.स. १९०३-४ सालीं २५१००० रुपये होते.  या तहशिलांत क्षार आल्यामुळें लागवडीस निकामी झालेली जमीन बरीच आहे.  लोअर गॅजेस कनालच्या एका फाट्याचें पाणी या तहशिलीस मिळतें. (इं. गँ.५.१९०८).