विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अडगांव - हें गांव प्रांत वर्‍हाड, जिल्हा अकोला, तालुका अकोट मध्यें आहे. उ. अक्षांश २१  ७० . पू. रेखांश ७६  ५९. लोकसंख्या तीनहजार. ह्या गांवाजवळील विस्तीर्ण मैदानावर जनरल वेल्सूली यानें रघूजी भोंसल्याचा भाऊ व्यंकोजी ह्यावर २९ नवंबर १८०३ रोजीं जय संपादन केला, व गाविलगडचा किल्ला सर केला.