विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजमोदा - ह्यास इंग्रजींत Celery Seed हें नाव आहे. ही एक ओंव्याची जात आहे. हें झाड वार्षिक आहे. हें झाड हिंदुस्थानांत पुष्कळ ठिकाणीं होतें. बंगल्यांत विशेषें-करून याची लागवड फार होते. याची उंची सुमारें दीड हात असते. व ह्यास पांढरे रंगाचीं बारीक फुलें येतात. भाजीपाल्याचे मसाल्यांतहि अजमोदा घालतात, व अजीर्णावरहि देतात. ( पदे वनौषधि गुणादर्श )