विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अढोई - कच्छमधील ( मुं. इ. ) मोर्वीच्या ताब्यांतील तटबंदीचें शहर. लोकसंख्या सुमारें साडेचार हजार. येथें कापसाचा बराच व्यापार चालतो. उत्तरेस सुमारें दोन मैलां- वर काठी लोकांच्या लपून बसण्याच्या लहान लहान गुहा आहेत. ( मुं. गॅ. )