विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अचला (किल्ला.) - मुंबई, नाशिक जिल्हा, चांदोर डोंगरामधील अगदीं पश्चिम टोंकावर हा किल्ला असून दिंडोरीच्या उत्तरेस २० मैलांवर आहे. इ. स. १८१८ मध्येंक कॅ. ब्रिग्ज यानें याचें असें अर्णन केलें आहे कीं हा डोंगरी किल्ल्याप्रमाणेंच असून याचा चढ जरा उभा व बिकट आहे. याला एक वेस असून बाकीच्या तटाचा पाया तेवढा दिसतो. यावरून हा तट पुरा बांधला गेला नसावासें वाटतें. छपरी चौकी असून तेथेंच दारूचें कोठार असावें. त्रिंबकेश्वर येथील किल्ल्याबरोबर १८१८ मध्यें कर्नल मॅकडोवेल यास मिळालेल्या १७ किल्ल्यांपैकीं हा एक होता. [ Blaker's Mahratha War ३२२ ].