विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतपुर तालुका - मद्रास. अनंतपुर जिल्ह्यांतील तालुका उ. अ. १४  २४' ते १४ ५५' व पू. रे. ७७  १७' ते ७७  ५९'. क्षेत्रफळ ९२५ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें एक लाख. यांत १०९ खेडीं आहेत. इ. स. १९०३-४ मध्यें एकंदर उत्पन्न १९०००० होतें. तालुका उंचसखल असून जमीन तांबडी व दगडाळ असून हलक्या प्रतीची आहे. म्हणून जंगल व झाडी या भागांत कमी असल्यामुळें प्रदेश ओसाड दिसतो. उत्तरेकडील जमीन थोडी काळी आहे. उत्तरेकडे आणि पूर्वेकडे अनुक्रमें पेन्नार आणि चित्रावती या नद्या आहेत परंतु त्यांचा शेतीला उपयोग होत नाहीं.