विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अद्धनकी – मद्रासइलाख्यांत गंतूर जिल्ह्यांत ओंगोल तालुक्यांतील एक शहर. ओंगोल रेलवे स्टेशनपासून २३ मैलांवर गंडलकम्मा नदीच्या कांठावर. उत्तर अक्षांश १५० ४९’ व पूर्व रेखांश ७९० ५९’वर हें वसलेलें आहे. इ. स. १९०१ लोक-
संख्या ७२३०. इ. स. १४०० चे सुमारास प्रतापरुद्राचा मुलगा हरिपालुदु यानें बांधलेला एक मातीचा किल्ला येथें आहे. गळिताचीं धान्यें व गुरें यांचा बाजार येथें बराच मोठा भरतो. येथें डेप्युटि तहशिलदाराची कचेरी आहे. ( इं. गॅ. ५ ).