विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनंग भीम :- कलिंग देशाचा राजा. यास लाडदेव असेंहि दुसरें नांव होतें. यानें शके १०९४ मध्यें जगन्नाथाचें देऊळ बांधिलें, अशाविषयींचा लेख त्या देवळांतील एका दगडी खांबावर कोरलेला आहे. अनंगरंग ग्रंथाचा कर्ता जो कल्याणमल्ल तो याच्या पदरीं होता.