विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अक्काबाईंचा फेरा - वडील बहिणीला ''अक्का'' म्हणण्याची चाल आहे.  लक्ष्मीची वडील बहीण (अक्का) ग्रहदशा ही आहे.  यावरुन अक्काबाईचा फेरा म्हणजे वाईट ग्रह येणें, दारिद्र्य प्राप्‍त होणें, असा अर्थ आपटे कृत ''मराठी भाषेचे संप्रदाय आणि म्हणी'' यांत दिला आहे.  पण यास आधार उपलब्ध नाहीं.  याचप्रमाणें अकाबाईचा पाया; अक्काबाईची दया (दारिद्र्य); अक्काबाईचें बाळ (कुलक्षणी बाळ) इत्यादि म्हणी अक्काबाई शब्दावरुन आल्या आहेत.