विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अदवानी तालुका – बेल्लारी जिल्ह्यांतील (मद्रास) अगदीं उत्तरेकडील तालुका. अदवानी हें पूर्वी निजामचें पोट-संस्थान होते. उत्तर अक्षांश १५० ३०’ व १५० ४८’यांच्या दरम्यान व पूर्व रेखांश ७६० ५६’व ७७० ३८’मध्यें असून याचें क्षेत्रफळ ८३९ चौ. मै. आहे. लोकसंख्या सुमारें एक लक्ष ऐशींहजार. यांत तीन शहरे व १९१ खेडीं आहेत.
श ह रें – अदवानी, लोकसंख्या ( तीस हजार ) मुख्य ठिकाण. योमिगनुर ( चवदा हजार ), कोसिगि ( आठ हजार ). येथील प्रदेश सपाट असून जमीन काळी भोर कापसाच्या पिकास योग्य अशी आहे. कांहीं ठिकाणी उंचवटे आहेत. मुख्य पिंकें म्हणजे कापूस, चोलम (Cholam) कोरा (Korra). जमिनीचा मगदूर इतका चांगला आहे कीं दर एकरीं येथें सरकार सारा १४ आणे आहे. सर्व पिकें पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. फक्त शेंकडा १ एकरास विहिरीचें पाणी मिळतें. त्यामुळें अवर्षणाच्या वर्षीं फार हाल होतात. इ.स. १८७६-८ चे दुष्काळात १/३ लोक अन्नान्न होऊन रोगांनीं मृत्युमुखीं पडले.