विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अगरखेड - हें भीमेच्या तीरावर एक गांव आहे. हें इंदीच्या ईशान्येस सुमारें १५ मैलांवर आहे. गांवाच्या दक्षिणेस एक जुनें शंकरलिंग देवाचें देऊळ आहे. धैरापना गुडील नांवाचें दुसरें एक हेमाडपंती देऊळ गांवांत आहे. ह्या देवळांत शके ११७२ चा एक शिलालेख आहे. लोकसंख्या सुमारें चार हजार आहे.