विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अग्रहारी - जबलपूर जिल्हा व राजगड संस्थान येथें राहणारी वनिया लोकांची एक उपजाती. यांचा आग्र्याशीं संबंध आहे.
संयुक्त प्रातांत ही जात मुख्यत्त्वेंकरून आढळते. १९११ सालीं एकंदर ७९२७९ अग्रहारी होते. पैकीं ७७२८३ संयुक्त प्रांतांतले आढळले. या लोकांत ७९१७४ सनातनी हिंदु, १०० शीख, ५ जैन, मिळून ७९२७९ होते.