विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अतिकाय – धान्यमालिनी नामक स्त्रीपासून, रावणास झालेला पुत्र. याचें शरीर अतिस्थूल होतें म्हणून यास हें नांव पडले होतें. यानें ब्रह्मदेवाचें आराधन करून तो प्रसन्न झाल्यावर, अस्त्रें, कवचें, दिव्यरथ, आणि सुरासुरांपासून अवध्यत्व, इत्यादि संपादिलें होतें म्हणून इंद्राचा पराभव केला, व वरुणास जिंकून त्याचा पाशहि आणिला. रावणास याचें मोठें साह्य होतें. कुंभकर्ण मरण पावल्यावर, हा युद्धार्थ रामासंमुख आला असतां, लक्ष्मणानें याशीं घोर युद्ध करून यास मारिलें. ( वा० रा० युद्ध० स० ७१ ).