विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकाडीया - मुंबई इलाखा काठेवाडांतील बाब्र ठाण्यांतील एक स्वतंत्र खंडणी देणारें संस्थान. बाब्राच्या ईशान्येस सुमारें २० मैलांवर व भाडली पासून उत्तरेस चार मैल, केरी नदीच्या उत्तरतीराला हें वसलेलें आहे. येथील गरासिया जमीनदार बावड रजपुत वंशाचे असून या द्वीपकल्पांत हेंच एक त्यांचें स्वतंत्र ठिकाण आहे. ( इं. गॅ. ५; मुं. गॅ. ८ ) (बां. गॅ. ८,३५६. )