विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतदेव - (१) हा भास्कराचार्याच्या वंशांतला होय. यानें ब्रह्मगुप्ताच्या सिद्धांतांतील २० व्या अध्यायावर आणि बृहज्जातकावर टीका केली आहे. याचा शककाल ११४४ होय. ( श. बा. दीक्षित - भारतीय ज्योति:शास्त्र.)

(२) - कृष्णभक्तिचंद्रिका नाटकाचा कर्ता. याचे बापाचें नांव आपदेव होतें. अनंतदेव हा बाजबहादूर चंद्राचा आश्रित होता. त्याचा पिता आपदेव हा एका पूर्वकालीन अनन्तदेवाचा पुत्र व एका पूर्वकालीन आपदेवाचा नातू होता. ( ऑफ्रेक्टकॅट. कॅट. पीटरसन-रिपोर्ट ४ ).