विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अगीर - पंजाबांतील एक जात.  लो.सं. ३०२७ अगीर हे सर्व हिंदु आहेत.  ते मुख्यत्वेंकरुन रोहटक, गुरगांव, दिल्ली व मुलतान जिल्हे यांत आढळतात.  ते मीठ तयार करण्याचा धंदा करितात.  गुरगांव जिल्ह्यांतील अगीर आपणांस बिठोरच्या रजपूत लोकांचे वंशज म्हणवितात.  त्यांचा सामाजिक दर्जा बर्‍यांतला आहे;  म्हणजे ते लोहाराहून श्रेष्ठ आहेत आणि जाट लोकांच्या खालोखाल आहेत.