विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अथर्वणाचार्य : हा तेलगू ब्राह्मण कवि फार जुना आहे. सुमारें ३॥ हजार वर्षांपूर्वीं हा होऊन गेल्याविषयीं सांगतात. संस्कृत आणि तेलगू या दोन्ही भाषा यास उत्कृष्ठ येत होत्या. महाभारताच्या सारांशावर जो यानें तेलंगी भाषेंत ग्रंथ रचिला तो तुटक तुटक अशा रीतीनें कांहीं कांहीं उपलब्ध आहे. याच्या मागून झालेल्या कवींच्या ग्रंथांत याच्या कवितेचा पुष्कळ भाग त्यांनीं घेतलेला आढळतो. (परशा – तेलगूवाङमय; जनार्दन रामचंद्र – कविचरित्र ).