विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अतरसुंबा गांव – बडोद्याच्या अतरसुंबा पोटभागांतील (मुं.इ.) ठिकाण. लोकसंख्या तीन हजार. येथें महालकरी कचेरी, टपाल कचेरी, गुजराथी शाळा व एक पडित किल्ला आहे. येथील लोक कांहीं लोखंडी काम करितात व त्यांची सुर्यांबद्दल प्रसिद्धी आहे. (मुं.गॅ.).