विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अघासुर - कंसानें कृष्णास मारण्यासाठीं पाठविलेला राक्षस. हा बक व पूतना यांचा भाऊ व कंसाचा सेनानायक होता. यानें सर्पदेह धारण केला व तो चार योजनांइतका मोठा असून त्याच्या मुखांत गाई व गोप दरी समजून प्रवेशले. कृष्णानें त्यांत प्रवेश करून स्वत: मोठा देह धारण केला व या रीतीनें त्यास फाडून मारलें. ( भागवत द.स्कं.अ.१२ )