विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अमिनें − रसायनशास्त्रांत अमिनें ( अमाइन्स ) म्हणजे अम्न ( अमोनिया ) मधील एक किंवा अधिक उज्ज परमाणू उत्कर्बिल (आल्किल) किंवा गंधिल ( अ‍ॅरिल ) मूलकानें नि:सारित होऊन झालेला आदिष्ट पदार्थ होय. एक उत्कर्बिल किंवा गंधिल मूलकानें एक उज्ज परमाणु नि:सारित झाला असल्यास प्राथमिक अमिनें होतात. दोन मूलकांनीं दोन उज्ज परमाणू नि:सारित झाले असल्यास द्वितीयक अमिनें आणि तीन मूलकांनीं तीन उज्ज परमाणू नि:सारित झाले असल्यास तृतीयक अमिनें तयार होतात. तृतीयक अमिनांच्या अंगीं एक अणुप्रमाण उत्कर्बिल अदिदां (आल्किल आयोडाइड) शीं संयोग होण्याचा धर्म असून चुतष्क (क्वाटर्नरी) अमोनिक्षार (अमोनियम साल्ट्स) होण्याचाहि धर्म आहे. या संयुक्त पदार्थांच्या रचनेंतील संबंध खालीं दिलेल्या सारण्यावरून ध्यानांत येईल:-

अम्न=नउ;
प्राथमिक अमिन=नउ ( मू )
द्वितीयक अमिन=नउ ( मू )
तृतीयक अमिन=न ( मू )
चातुर्थिक अमोनि अदिद=नमू

तै ल व सा व र्गां ती ल ( अ‍ॅलिफॅटिक ) अ मि नें.-या संयुक्त पदार्थांचे धर्म ( अम्न धर्म ) समान आहेत. या वर्गांतील जे हलके म्हणजे कमी भारांकांचे संयुक्त पदार्थ आहेत, ते सहज्वलनीय वायुरूप असून पाण्यांत सहज विद्रुत होतात. यापेक्षां जे भारदार आहेत ते रसरूप असून त्यांचे उत्क्वथनांक कमी असतात व तेहि पाण्यांत सहज विद्राव्य असतात;परंतु अणूंमध्यें कर्बचें प्रमाण जसजसें वाढतें तसतशी त्यांची विद्राव्यता व बाष्पीभवनशक्ति (व्हाल्टॉलिटि ) कमी कमी होत जाऊन व अगदीं शेंवटचे म्हणजे अतिभारांकांचे पदार्थ तर निर्गंध घनपदार्थ असून त्यांचा उत्क्वथनांक फार उच्च असतो व ते पाण्यांत अविद्राव्य असतात. ते अति तीव्र अल्क असतात. त्यांचे खनिजाम्लांशीं त्वरित क्षार होतात आणि स्वर्ण, प्लातिन व पारद यांच्या हरिदांशीं द्वित्त्व क्षार होतात. जलद्रवांमध्यें अम्नपेक्षां या अमिनांचें वैद्युदण्वीभवन ( आयोनाइझेशन ) फार होतें, त्यांत चातुर्थिक अमोनि अनाम्लांचें वैद्युदण्वीभवन तर अतिशयित होतें; द्वितीयक अनाम्लें यांचें वैद्युदण्वीभवन प्राथमिक किंवा तृतीयक अनाम्लांपेक्षां एति शीघ्र व तीव्र होतें.

हें अमिन तयार करण्याच्या पुष्कळ रीती आहेत. पहिलें अमिन इ. स. १८४९ मध्यें ए. वुर्टझ यानें दाहकसिंधु बरोबर मथिलतुल्य कनित ( मेथिल इसोसायनेट ) उकळून तयार केलें, तें असें:-

 मथिलतुल्यकनित  +  दाहकींसधु   =  मथिनअमिन  +  सिंधुकर्बित
  कप्रन. कउ३  २ धु प्रउ  कउ३ नउ२  धु२ क प्र६

प्राथमिक अमिनें खालील रीतीनें तयार करतां येतात:-
( १ ) उत्कर्बिल अदिदें अम्नबरोबर उष्ण करून, ( २ ) अल्कहल आणि सिंधु याच्यायोगानें नत्रायिलांचे (नायट्राइल्स) सोज्जिकरण करून, ( ३ ) नत्राम्लांचीं संयुक्त इथ्रें ही अल्कहलयुक्त अम्न ( अमोनिया ) शीं १०० श उष्णमानावर उष्ण केल्यानें, ( ४ ) नत्रिल अस्नेहिन ( नायट्रो पॅराफिन्स ) वर सोज्जिकारकां ( रिड्युसिंग एजंट्स ) चें कार्य केल्यानें, ( ५ ) प्रायोज्जिद अम्नवर ( आल्डि हाईड अमोनिया ) उद्धराम्ल व जशद यांचें कार्य केल्यानें वगैरे.

द्वितीयक अमिनें हीं प्राथमिक व तृतीयक अमिनांबरोबर तयार होतात व मुख्यत्वें हीं अमिनें उत्कर्बिल अदिदांवर अम्नचें कार्य केलें म्हणजे तयार होतात. या तिन्हीं अमिनांबरोबर चातुर्थिक अमोनिक्षारहि तयार होतात. या मिश्रणांतून हीं अमिनें निरनिराळीं करणें हें फार कठिण काम आहे. या कामीं ए. डल्ब्यू हाफमन ज्या रीतीचा उपयोग करतो. ती अशी.-

हें सर्वमिश्रण दाहक पालाश मिळवून पातन करावें म्हणजे प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक अमिनांचा पात होतो आणि चातुर्थिक अमोनिक्षार अविकृत असा मागें राहतो. अमिनांचा पात होऊन जो जलयुक्त द्रव आलेला असतो त्यांत द्विइथिल काष्ठित ( डाय एथिल ऑक्झलेट ) घालून तें मिश्रण चांगलें हलवावें म्हणजे प्राथमिक अमिन संयुक्त होऊन त्याचें स्फटिकरूप द्विउत्कर्बिल काष्ठामिदांत ( ऑक्झमाइड ) रूपांतर होतें आणि द्वितीयक अमिनाचा अद्राव्य असा इधिल द्विउत्कर्बिल काष्टमित ( एथिल डाय आल्किल ऑक्समेट ) घटनेचा द्रव तयार होतो आणि तृतीयक अमिन अविकृत स्थितींत राहतें. याचें पातन केलें म्हणजे  तृतीयक अमिनाचा पात होतो. जीं अमिनें शेष राहतात तीं गलन क्रियेनें पृथक् करितात. नंतर त्यांवर दाहक अल्कची क्रिया केली म्हणजे विवक्षित अमिन निराळें होतें.

प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक अमिनें हीं एकमेकांपासून ओळखण्याच्या पुष्कळ रीती आहेत.

प्रा थ मि क अ मि नें.−अल्कहलयुक्त दाहक पालाश व हरपुत्तिक ( क्लोरोफॉर्म ) यांशीं उष्ण केलें म्हणजे तुल्य नत्रायिल (इसोनायट्राइल) तयार होतें व हें त्याच्या दुर्गंधीवरून ओळखतां येतें. द्वितीयक आणि तृतीयक अमिनांवर अशी क्रिया घडत नाहीं. नत्रसाम्ला ( नायट्स अ‍ॅसिड )ची क्रिया केल्यास प्राथमिक अमिनांचें रूपांतर अल्कहलांत होतें द्वितीयक अमिनाचें रूपांतर नत्रल अमिनांत ( नायट्रोसोअमाइन्स ) होतें व तृतीयक आमल अविकृत राहतें. या रासायनिक क्रिया खालीं दाखविल्या आहेत:-

  प्राथमिकअमिन  +  नत्रसाम्ल  =   अल्कहल  +  नत्र  +  पाणी
  मू. नउ  उन प्र   मू. प्र उ  न  उ + प्र
  द्वितीयक अमिन  +  नत्रसाम्ल  =  नत्रल  +  अमिन  +  पाणी
  मू नउ   उन प्र  मू  न.नप्र  उ प्र.

मथिल अमिन ( मेथिल अमाइन ) कउ नऊ हें अमिन ( मर्क्युरिआलिस पेरेन्निस ), अस्थितैल ( बोन ऑईल ) आणि समुद्रांतील हेरिंग माशाच्या क्षार जलांत असतें. पुष्कळ अल्कोदांचे पृथक्करणापासून जे पदार्थ उत्पन्न होतात त्यामध्येंहि हे अमिन असतें. साधारण उष्णमानावर मथिल अमिन वायुरूप असतें; परंतु शीतता व दाब यांच्या योगानें हें रसरूप होतें. हा रस−६ श उष्णमानावर उकळतो. यास तीव्र अम्नगंध असतो, हा शीघ्र ज्वालाग्राही असून पाण्यांत अत्यंत विद्राव्य असतो. याचें स्थित्यंतरदर्शक उष्णतामान १५५ श स्थित्यंतर भार ७२ ( वातावरणाच्या ७२ पट दाब ) आहे.

द्विमथिल अमिन ( डाय मेथिल अमाइन ) [ कउ. ] २ नउ हा पेरू देशांतील पक्षांच्या मलांत ( पेरूव्हिअन ग्वानो ) असतो. हा फार जडवायुरूप आहे. त्याचा ७ श उष्णमानावर रस होतो. यास माशासारखा वास असतो म्हणून यास मत्स्यगंध वायू असेंहि म्हणतात.

त्रिमथिल अमिन ( ट्रायमेथिल अमाइन ) ( कउ ) न याचें द्विमथिल अमिनाशीं पुष्कळ साधर्म्य आहे. रसरूप त्रिमथिल आमन ३.२−३.८’ श वर उकळतो. बीट नांवाच्या मुळ्यांपासून साखर काढून घेतल्यावर जो शेष राहतो त्याजवर विपाकक्रिया ( फरमेन्टेशन ) करून अल्कहल काढून घेतात. या विपाकशेषापासून हा अमिन तयार करितात. व या अमिनाचा उपयोग सॉल्व्हेच्या रीतीनें मिठापासून पालाशद्विकर्बित ( पोट्याशिअम बाय कार्बोनेट ) तयार करण्याकडे करितात.

द्वि अ भि नें − द्विअमिनांमध्यें दोन अम्निल मूलकें ( संघ ) असतात. प्राथमिक एकामिनाचा आणि प्राथमिक अल्कहलाचा जो संबंध आहे तोच संबंध द्विअमिनें व स्वकल ( ग्लाय कोल्स ) यांच्यामध्यें आहे. द्विअमिनें फार महत्त्वाचे पदार्थ आहेत कारण यांची उच्च समपदें (हायर होमोलोग्ज) हीं पुष्कळ बाबतींत, बीलिन ( आल्बुमिन ) नांवाचे जे पदार्थ आहेत त्यांवर सूक्ष्मजंतूंची क्रिया होऊन कोथक्रिया उत्पन्न होते व त्यापासून जे कोथज पदार्थ तयार होतात त्यांत असतात.

गं धा मि नें ( अ‍ॅरोमॅटिक अमाइन्स ):-गंधामिनांचें पुष्कळ बाबतींत तैलामिनें ( उत्कर्बिल अमिनें ) यांशीं साम्य आहे. कारण तीं अम्लांशीं संयुक्त होऊन त्यांचे क्षार होतात प्लातिन हरिदांशीं त्यांचे संयुक्त क्षार होतात त्याचप्रमाणे पृथक्करण न होतां त्यांचें पातन होतें. परंतु दुसर्‍या पक्षीं गंधामिनें हीं उत्कर्बिल अमिनापेक्षां कमी अनाम्ल (बेसिक) धर्मी आहेत. कारण त्यांची क्षारांवर जलद्रवांत उदकप्रक्रिया अतिशय (हायड्रोलायटिक डिससोसिएशन) होते.

प्राथमिक गंधामिनें हीं नत्रिल गंधिल उत्कर्बिलां ( नायट्रोअ‍ॅरोमटिक हायड्रो कार्बन ) पासून सेज्जिकरणानें ( रिडक्शनं ) तयार करतात यासाठीं सोज्जिकरणानें मुख्यत्वेंकरून [१] अल्कहलयुक्त अमोनि गंधकिद, [२] जशद आणि उद्धराम्ल, (३) उद्धराम्लयुक्त वंगस हरिद ( स्टॅन्नस क्लोराइड) याचा अल्कहलांत केलेला द्रव, (४) वंग व उद्धराम्ल किंवा मोठ्या उत्पादन प्रमाणावर लोह आणि उद्धराम्ल याचा उपयोग करितात. याशिवाय नत्रस संयुक्त पदार्थ (नायट्रोसो कांपाउंड्स) उन्नत्र उन्नत्रिन ( हायड्राझोन्स ) यांचें सोज्जीकरण करून किंवा भानलों (फिनोल्स)चें जशदहरिदा (झिकक्लोराईड) बरोबर पातन केलें म्हणजे हीं गंधामिनें (अ‍ॅरोमॅटिक) तयार होतात.

हीं प्राथमिक गंधामिनें निर्वर्ण, रसरूप किंवा घनस्फटिक रूप असून पाण्यांत अविद्रव्य असतात. परंतु सेन्द्रिय द्रावकांत हीं सहज विद्राव्य असतात. हीं अमिनें उत्कर्बिल किंवा गंधिल अदिदांशीं उष्ण केलीं असतां तीं द्वितीयक आणि तृतीयक अमिनांत रूपांतर पावतात. यांवर तीव्र नत्राम्लाचें जोराचें व बलवत्तर कार्य होतें, व पुष्कळ प्रकारचे प्राणिदीकरण युक्त पदार्थ उत्पन्न होतात. परंतु ही नत्रीकरणाची क्रिया करण्यापूर्वीं दारिलीकरण (अ‍ॅसिटिलेटेड) करून जर अम्निल संघाचें संरक्षण केलें तर नत्रिलसंयुक्त पदार्थ तयार होतात. निर्जल गंधकाम्लाशीं हीं अमिनें कांहीं वेळ उष्ण केलीं म्हणजे त्यांचें गंधकिलीकरण (सल्फोनेशन ) होतें. प्रायोज्जिदां (अल्डिहाइड्स) शीं यांचें घनीकरण (कंडेन्सेशन) होऊन तज्जन्य पदार्थ ( प्रॉडक्टस ) तयार होतात. नीलीन ( अनिलीन ) आणि उदिल प्रायोज्जिद ( बेझाल्डिहाइड ) यांपासून उदिलिदिन नीलीन ( बेझिलिडीन आनिलीन) क६ उ७ न. कउ क६ उ५ तयार होतें; अम्लांबरोबर हीं उष्ण केलीं असतां त्यांपासून नीलीदें ( अनिलाइड्स ) तयार होतात. हरपुत्तिक आणि दाहक अल्क यांशीं हीं उष्ण केलीं असतां तुल्य नत्रायिक क्रिया देतात; आणि कर्ब द्विगंधकिदाचा अल्कहलांत द्रव करून त्यांशीं उष्ण केलीं असतां उत्कर्बिल गंधकीय मौत्रकें (आल्किल थिओ युरीआज ) तयार होतात. नत्रसाम्लाच्या द्रवाबरोबर उष्ण केलीं असतां त्यांचें भानलांत (फिनोल्स) रूपांतर होतें. परंतु प्राथमिक अमिनाचा अम्लांत द्रव करून फाजील अम्ल ठेवलें व तो द्रव ०  श उष्ण मानावर ठेऊन जर नत्रसाम्ल त्यांत मिळविलें तर द्विअजीवी क्षार (डाय अझोनियम) तयार होतो; अम्लाचा अंश फाजील नसेल तर द्विअजीवी अमीन तयार होतें.

द्वि ती य क अ मि नें − हीं दोन प्रकारचीं आहेत. एक शुद्ध गंधिल अमिनें ( अ‍ॅरोमॅटिक अमाइन्स ) आणि दुसरीं मिश्र द्वितीयक अमिनें-यांत गंधिल शेष (अ‍ॅरोमॅटिक रेसिड्यु )आणि उत्कर्बिल संघ हीं असतात. शुद्ध गंधिल अमिनें हीं प्राथमिक अमिनें त्यांच्या हरिदांशीं उष्ण केलीं म्हणजे तयार होतात. याशिवाय कांहीं प्रसंगीं प्राथमिक अमिनें आणि निरूद जशद हरिद यांचें मिश्रण भानल ( फिनोल ) बरोबर उष्ण केलें म्हणजे तयार होतात.

मिश्र द्वितीयक अमिनें पुढें दिलेल्या रीतीनें तयार होतात:-
( १ ) उत्कर्बिल अदिदांची क्रिया प्राथमिक अमिनांवर केली असतां किंवा ( २ ) प्राथमिक अमिनांचे क्षार हे दाबाखालीं अल्कहलांशीं उष्ण केले असतां.

मिश्र द्वितीयक अमिनांचे अंगीं अनाम्ल धर्म असतात. परंतु शुद्ध गंधिल द्वितीयक अमिनें हीं फार कमजोर अनाम्लें आहेत. या दोन्ही वर्गांतील इमिद उज्ज ( इमाइड हायड्रोजन ) अम्ल मूलकांच्या योगें सहज नि:सृत होतो; आणि नत्रसाम्लाच्या योगानें नत्रल अमिन क्रिया होते. द्वितीयक अमिनें तुल्य नत्रायिल ( इसो नायट्राइल ) क्रिया देत नाहीं.

तृतीयक अमिनांचेहि दोन प्रकार आहेत: ( १ ) शुद्ध गंधिल अमिनें आणि ( २ ) मिश्र अमिनें.

मिश्र तृतीयक अमिनें हीं प्राथमिक अमिनांवर उत्कर्बिल हरसंघिदांची ( आल्किल इलाइड्स ) क्रिया केली असतां तयार होतात.

साधा गंधिल तृतीयक अमिन म्ह. त्रिभानिल ( ट्रायफेनिलअमाइन ) होय. सिंधुद्विभानल अमिन ( सोडिअम डायफेनिल अमाइन ) वर स्तंभ उदीन ( ब्रोमबेंझिन )ची क्रिया केली म्हणजे त्रिभानल अमिन तयार होतो.अगदीं साधा गंधिल एकामिन (मोनमाइन) म्हटला म्हणजे नीलीन ( अनिलीन ) आहे तो पाहणें. साधीं मिश्र अमिनें म्हटलीं म्हणजे एक आणि द्विमथिल नीलीन ( डायमेथिल अनिलीन ) होत. या पदार्थांचें वर्णन नीलिन ( अनीलीन ) शब्दाखालीं येईल.

गंधिल अमिनापैकीं चर्बी वर्गांतील उत्कर्बिल अमिनांशीं साम्य पावणारा अमिन म्हटला म्हणजे उदील अमिन (बेंझिल अमाइन) क६ उ५ उ५ कउ२ हा आहे. उदील नत्रायिल (बेंझो नायट्राइल) चा अल्कहलांत द्रव करून त्याचें जशद आणि दार्वम्ल किंवा सिंधुधातु यांच्या योगें सोज्जिकरण केलें म्हणजे उदिल अमिन तयार होतो. उदिल हरिदांवर ( बेंझिल लोराइड ) अम्न (अमोनिया )ची क्रिया केली म्हणजे हा अमिन तयार होतो. परंतु त्याच्याबरोबर द्वि आणि त्रि उदिल अमिनें तयार होतात. उदील अमिन हा द्रव रस रूप असून त्याचा उत्क्वथनांक १८३ श आहे. तो पाणी, अल्कहल व इथ्र (ईथर) यांत सर्व प्रमाणांत विद्राव्य आहे. हा अनाम्ल (बेसिक) धर्मी असून त्याची फार तीव्र अल्कक्रिया असते.

द्विभानिल असिन ( क )२ नउ२ हा खर्‍या गंधिल द्वितीयक अमिन वर्गाचा द्योतक आहे. नीलीन ( अनीलीन ) आणि नीलीनहरिद हे कांहीं तास २१० ते २४० श उष्णमानावर उष्ण केले म्हणजे द्विभानिल अमिन तयार होतो. याचे पांढरे चपटे स्फटिक होतात. हे ४५ श वर वितळतात व ३०२ श वर उकळतात. हे स्फटिक पाण्यांत बहुतेक अविद्राव्य आहेत परंतु वाफेबरोबर हे सुलभ पातन पावतात.

गं धि ल द्वि अ मि नें.−नत्रिल नीलीने ( नायट्रानिलाइन ) किंवा द्विनत्रिल उत्कर्बिल यांचें सोज्जिकरण केलें म्हणजे गंधिल द्विअमिनें तयार होतात. यांचे चपटे स्फटिक होतात व हीं बहुतेक पृथक्करण न होतां पातन पावतात. आसन्न भानिलीन द्विअमिन क६ उ ( नउ ) याचे जलद्रवापासून चपटे स्फटिक होतात. याचा रसांक १०२ १०३ असून उत्क्वथनांक २५६−२५८ श असतो. शेंकडा १० भाग उद्धराम्लाबरोबर १८० श उष्णमानावर हा अमिन उष्ण केला म्हणजे त्याचें तिग्म क्वाथिन ( पायरो कॅटेचिन ) मध्यें रूपांतर होतें. आसन्न द्विअमिनाचे मुख्य लक्षण हें आहे कीं घनीकरणाच्या योगें त्यापासून निरनिराळे अनेक पदार्थ तयार होतात. मितभानिलीन द्विअमिन ( मेटाफेनिलीन डाय अमाइन ) चे चतुरस्त्र चपटे स्फटिक असून ते ६३ श वर विळतात व २८७ श वर उकळतात. हा अमिन पाण्यांत व अल्कहलांत सहज विद्राव्य आहे. शेंकडा १० भाग उद्धराम्ला बरोबर १८ श उष्णमानावर हा अमिन उष्ण केला म्हणजे त्याचें रूपांवर शिलावल्करालिन ( रिसॉर्सिन ) मध्यें होतें. परभानिलिन द्विअमिन ( पॅराफॅनिलीन डाय अमाइन ) वर सांगितलेल्या रीतीनेंच तयार होतो. याचे चपटे स्फटिक असून त्यांचा रसांक १४० श व उत्क्वथनांत २६७ श असतो. शेंकडा १० प्रमाणाच्या उद्धराम्लाबरोबर १८० श उष्णमानावर हा अमिन उष्ण केला असतां त्याचे रूपांतर उदकिनन ( हायड्रो क्विनोन ) मध्यें होतें. मंगलद्विप्राणिद ( मँगनीज डायऑक्साइड) आणि पातळ गंधकाम्ल यांच्या योगानें याचें प्राणिदीकरण होऊन किनन ( किनोन ) मध्यें रूपांतर होतें.

अमिनांचे हे तिन्ही वर्ग एकमेकांपासून नत्रसाम्लाच्या योगानें ओळखतां येतात. आसन्न संयुक्त ( ऑर्थोकांपाउन्डस ) अमिनांचें घनीकरण होऊन अजीवीमिद उदिन ( अ‍ॅझइमिडो बेन्झिन ) तयार होतो. मितसंयुक्त ( मेटा कांपाउंड्स ) अमिनांपासून पुष्कळ रंग-अजीवी-रंग ( अझोडाइज ) तयार होतात. आणि परसंयुक्त ( पॅराकांपाउन्डस ) अमिनांपासून द्विद्यजीवी ( बिस डाय अ‍ॅझो ) संयुक्त पदार्थ क्षन. क क्ष या घटनेचे तयार होतात.