विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अग्निवेश्य - (१) एक ब्रह्मर्षि (२) सूर्यवंशी नरिष्यंत कुलोत्पन्न देवदत्त राजाचा पुत्र याची जातुकर्ण्य आणि कानीन अशीं नामांतरें होत.
हा तापानें ब्राह्मण झाला होता. याच्या संततीस अग्निवेश्यायन असें नांव पडलें होतें. (३) अगस्त्य ऋषीचा एक शिष्य. याजपासून द्रोणाचार्यानें धनुर्वेदाची शिक्षा व ब्रह्मशिर नांवाचें अस्त्र संपादन केलें होतें. हा पांडवांसमागमें कांहीं काळ द्वैतवनांत होता. (४) या नांवाचे अनेक राजे भारतीयुद्धांत पांडवांकडे होते.