विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकापुलको - अकापुलको हें शहर मेक्झिको देशांत ग्युटो संस्थानांत पॅसिफिक महासागराचे किनार्यावर आहे. हें एका अर्धवर्तुलाकृति उपसागरावर आहे. हें या महासागराचें किनार्यावरचें सर्वांत उत्तम बंदर होय. याच्या भोंवतींचे सृष्टिसौंदर्यही फार प्रेक्षणीय आहे. समुद्रावरील थंड हवा आंत घेण्याकरतां याच्या जवळच्या पर्वतांत एक बोगदा खोदला आहे.