विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अथणी तालुका : मुंबईप्रांतांत बेळगांव जिल्ह्यांतील ईशान्येकडचा एक तालुका. १९२१ मधील लो. सं. १२४६७८. अथणी व कुडची हीं या तालुक्यांतील मोठीं गांवें आहेत. बहुतेक जमीन ओसाड व वृक्षरहित आहे. हवा कोरडी व निरोगी आहे. या तालुक्याच्या दक्षिण भागांतून कृष्णा नदी वहाते.