विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अत्रावळी :- हें गांव, संयुक्त प्रांतात, अलिगड जिल्ह्यांतील अत्रावळी तालुक्यांत आहे. १९०१ मध्यें याची लो. सं. १६५६१ होती. १८५७ सालच्या बंडाच्या वेळीं हें गांव जून पासून सप्टेंबरपर्यंत बंडखोरांच्या ताब्यांत होतें. दंगेखोरपणाबद्दल येथील मुसलमानांची ख्याती आहे.