विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अचोली - आफ्रिकेंत आलबर्ट नायांझा सरोवराच्या उत्तरेस १०० मैलांवर वरच्या (Upper) नाइल नदीच्या थंडींत राहणार्‍या नीग्रो लोकांस '' अचोली '' असें म्हणतात. ह्या लोकांत गालांवर व मांड्यांवर नागमोडीसारखे पट्टे काढून आपलें शरीर सुशाभित करण्याची चाल आहे. त्यांच्या झोंपड्या वाटोळ्या असतात व त्या आंतून चिखलानें सारविलेल्या असतात. आपलें पोट पारध करून भरतात व लढाईचे वेळीं ढाल व भाल्याचा उपयोग करितात.