विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजशृंगीं (मेंढशिंगी) - ह्या वनस्पतीचा वेल असतो. हिला संस्कृतमध्यें मेषशृंगी असेंहि नांव आहे. मराठींत मेंढ-शिंगी, हिंदुस्थानींत मेंढाशिंगी असें म्हणतात. ह्या वेलीचा रस दुधासारखा असतो. हिचीं फळें मेंढ्याच्या शिंगाचे आकाराचीं असतात. ह्या वेलास कांटे असतात. मुख्यत्वें नेत्रविकारावर हिचा उपयोग होतो. मेंढशिंगी वेली खंडाळ्याच्या घांटावर व इतर डोंगरावर बर्याच आढळतात. वांतीच्या योगें कफबाहेर काढणारी ही वनस्पति आहे. हिच्या सालीचाहि औषधाचे कामीं उपयोग होतो. ( पदे-वनस्पति गुणादर्श )