विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अका कांग्वा - दक्षिण अमेरिकेंतील चिली देशांत एक प्रांत आहे. हा फार डोंगराळ आहे.  येथील हवा फार उष्ण व कोरडी आहे.  येथें द्राक्षें फार चांगलीं होतात.  याच नांवाचा ज्वालामुखी पर्वंत व नदीहि येथें आहेत.  या प्रांताची लोकसंख्या सुमारें बाराहजार आहे.