विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अड्रिआटीक समुद्र - हा भूमध्य समुद्राचा भाग असून इताली व आस्ट्रीया हंगेरीचा किनार्‍याचा भाग, मांटेनीग्रो व अलबिनियाच्या किनार्‍यालगतचा प्रदेश यांमध्यें आहे. यास हें अ‍ॅड्रीआ गांवावरून नांव पडलें. याची लांबी ५०० मैल व रुंदी ११० मैल आहे. हा ४०   ते ४५   ४५' उत्तर अक्षांशांत आहे. या समुद्राचे कांठीं व्हेनिस हें प्रसिध्द शहर आहे. इतालीकडचा किनारा सखल आहे व बाकीचा किनार्‍याचा भाग खडकाळ आहे. या समुद्राची सरासरी खोली १३३ पुरुष आहे.