विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजमीरीगंज :- आसाम प्रांत. सिल्हेट जिल्हा. हबीगंज विभाग. २४० ३३' उत्तर अक्षांश व ९१० १५' पूर्व रेखांश. हा सुर्मा नदीतरीं सहाशें लोकवस्तीचा गांव आहे. येथें व्यापार बराच चालतो येथून तांदूळ, सुकी मासळी, बांबू, चटया वगैरे बाहेर देशीं पाठवितात.