विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अटीना :- (१) इटाली देशांतील अत्यंत प्राचीन अशा ३ शहरांतील एक. हें लुकानियामध्यें आहे. याची तटबंदी अगदीं पुरातन अशी आहे. इ. स. पूर्वी ७ व्या शतकांत हें शहर होतें. येथें रोमनलोकांचें अर्धचंद्र सभागृह व पुष्कळ हस्तलिखितें आहेत. (२) हें एक गांव कॅसियम जवळ होतें. (३) याच नांवाचें एक गांव वेनेशीप्रांतांत होतें असें प्लिनीच्या ग्रंथांत आलें आहे.