विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अतूर - हें गांव, मद्रास इलाख्यांत, सालेम जिल्ह्यांतील अतूर तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. लोकसंख्या सुमारें दहा हजार. गांवाच्या उत्तरेस एक जुना किल्ला आहे. तेथें अठराव्या शतकांत प्रसिद्ध सरदार, घेटी मुदलियार, हा रहात असे. सालेमहून त्यागद्रुगला जाणाऱ्या घांटावर हा किल्ला असल्यामुळें हैदरअल्लीच्या युद्धांत याला बरेंच महत्व होतें. १७६८ त, व पुन्हां टिपूशीं झालेल्या युद्धांत इंग्रजांनीं हा किल्ला घेतला. येथें निळीची लागवड होते; व बैलगाडयाहि चांगल्या होतात. ( इं. गॅ. ).