विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अटलांटिक महासागर - वि स्ता र :- अटलांटिक महासागर हा इंग्रजी S अक्षराच्या आकाराचा पाण्याचा पट्टा यूरोप व आफ्रिका यांचा पश्चिम किनारा आणि उत्तर व दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा यांच्यामध्यें आहे. हा उत्तरेस आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेकडील दक्षिण महासागरप-र्यंत पसरला आहे. यामुळें भमध्यरेषेच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील असे अटलांटिक महासागराचे दोन भाग पडतात. यांपैकी उत्तर अटलांटिक हाच विशेष प्रसिद्ध असून त्याच्या पश्चिमेच्या बाजूला कॅरीबियन समुद्र, मेक्सिकोचें आखात, सेंटलॉरेन्सचें आखात व हडसन उपसागर असून, पूर्वेच्या बाजूला भूमध्य समुद्र, काळा समुद्र, उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र हे आहेत. उत्तर अटलांटिक महासागर हा आर्क्टिक महासागराला हडसन सामुद्रधुनी डेव्हिस सामुद्रधुनी, डेन्मार्क सामुद्रधुनी व नार्वेजियनसमुद्र यांनीं जोडलेला आहे. उत्तर अटलांटिकची रुंदी ६० अक्षांशाजवळ सुमारें २००० मैल, ५० अक्षांशाजवळ १७५० मैल, २५ अक्षांशाजवळ सर्वांत अधिक म्हणजे ४५०० मैल आहे. पुढें पुन्हां रुंदी कमी होऊन केपपामस आणि केपसेंटरॉक यांच्यामध्यें रुंदी फक्त १६०० मैल आहे.

दक्षिण महासागर उत्तर महासागराहून अनेक बाबतींत भिन्न आहे. म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंचा किनारा सरळ आहे, समुद्र वगैरे दोन्ही बाजूंस मुळींच नाहींत. रुंदी दक्षिणेकडे वाढत जाऊन ३५ दक्षिण अक्षांशाजवळ ३७०० मैल आहे. उत्तर महासागराचें एकंदर क्षेत्रफळ, त्यांतून निघणारे समुद्र वगळतां, १,०५,८८,००० चौरस मैल आहे. दक्षिण महासागराचें क्षेत्रफळ १,२६,२७,००० चौरस मैल आहे. अटलांटिक महासागराला पृथ्वीवरील बर्‍याचशा मोठमोठ्यानद्यांचें पाणी येऊन मिळतें. त्या नद्या सेंटलॉरेन्स, मिसिसिपी, ओरीनोको, अमेझॉन, कांगो, नायगर, लॉयर, र्‍हाइन, एल्ब वगैरे अनेक आहेत.

त ळ च्या पृ ष्ठ भा गा ची र च ना :- अटलांटिक महासागराच्या तळभागाच्या रचनेसंबंधानें विशेष महत्त्वाची गोष्ट अशी कीं ५०० उत्तर अक्षांशापासून ४०० दक्षिण अक्षांशापर्यंत बहुतेक मध्यभागाच्या सुमारास खडकाळ प्रदेशाचा एक पट्टा आहे. हा खडकाळ भाग साधारणत: १७०० पुरुष खोलीवर आहे. अझोर्स बेटांच्या बाजूला हा खडकाळ भाग बराच रुंद झालेला असून ५०० उत्तर अक्षांशाच्या सुमारास तो आयर्लंड व न्यूफाउंडलंड यांच्या दरम्यान पसरलेल्या खडकाळ प्रदेशाला जाऊन मिळालेला आहे. ५०० अक्षांशाच्या उत्तरेच्या बाजूला आईसलंड व फेरो बेटें यांच्यापासून स्काटलंडच्या उत्तर टोकांपर्यंतहि असाच खडकाळ भाग असून तो बराच उथळ म्हणजे सरासरी २५० पुरुष खोलीवर आहे. म्हणजे अटलांटिक महासागर आणि आर्टिक महासागर यांच्यामध्यें हा एक बांधच आहे. मधल्या खडकाळ पट्याच्या दोन्ही बाजूंला अटलांटिक महासागराची खोली पुष्कळ म्हणजे ३००० पुरुषपर्यंत आहे. आणि मधून मधून खोली याहूनहि जास्त आहे. अशा खोल भागांना (बिस्केच्या उपसागराजवळचा) पीकडीप, (केपव्हर्ड बेटाजवळचा) मोसलेलीप वगैरे नांवें दिलेलीं आहेत. बहामा बेटाजवळचा नेअर्सलीप हा सर्वांत मोठा व खोल असून त्याची खोली ४५६१ पुरुष आहे. १९०४ पर्यंत ४०० दक्षिण अक्षांशाच्या दक्षिणेकडील दक्षिण अटलांटिकच्या खोलीसंबंधाची माहिती बरोबर नव्हती. अंटार्टिक प्रदेशाचा शोध लावण्याकरितां गेलेल्या स्कॉटिश सफरींतील लोकांनीं दक्षिण अटलांटिकच्या दक्षिणेकडील तळभागाचा बराच शोध लावला. बोव्हेट बेटें आणि सँडवीच बेटें यांना जोडणारा एक पूर्वपश्चिम खडकाळ पट्टा आहे. आणि दक्षिणमहासागराच्या मध्यभागांत उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा सुमारें १००० मैलांचा खडकाळ पट्टा वरील पटयास जाऊन मिळाला आहे.

म हा सा ग र त ल सं शो ध न : - एच्. एम्. एस्.'' च्यालेंजर '' (१८७३ ते १८७६), जर्मन जहाज '' गॅझेल '' (१८७४ ते १८७६), '' ट्राव्हेलियर '' जहाज (१८८०), आणि युनायटेडस्टेट्सचें पाहणी करणारें '' ब्लेक '' जहाज यांतील मंडळींनीं अटलांटिक महासागराच्या तळभागाचें संशोधन बरेंच केलें व त्यांत जर्मन जहाज '' व्हायडीव्हीया '' ( १८९८ ) यामधील प्रोफेसर च्यून वगैरे मंडळी आणि अंटार्क्टिक प्रदेशाच्या संशोधनार्थ गेलेली मंडळी (१९०३ ते १९०४) यांनीं बरीच भर घातली.

बे टें :- इतर महासागरांच्या मानानें अटलांटिक महासागरांत बेटांची संख्या बरीच कमी आहे. खंडांच्या शेजारचीं बेटें म्हणजे भूमध्य समुद्रांतील कांही बेटें, आयस्लंड, ब्रिटिश
बेटें, न्यूफाउण्डलंड, वेस्टइंडीज, फॉक्लंडबेटें एवढींच आहेत. आणि मुख्य महासागरांतील अझोर्स, कॅनरीबेटें, केपव्हर्डबेटें, असेन्शनबेट, सेंटहेलेनाबेट, ट्रिस्टंडा-कुन्हा व बौव्हेटबेट हीं मुख्य आहेत.

खो ली व त ळ भा ग - उत्तर अटलांटिकची सरासरी खोली २०४७ आणि दक्षिण अटलांटिकची २०६७ पुरुष आहे.

अटलांटिक महासागराचा बहुतेक तळ भाग ग्लोबीजेरिना जातीच्या चिखलाचा बनलेला आहे. १००० ते ३००० पुरुष खोलीवरील भाग बहुतेक या जातीच्या चिखलाचा आहे. ३००० पुरुषांहून अधिक खोलीचा भाग तांबडया चिकण मातीचा आहे. उष्ण कटिबंधांतला उथळ भाग प्टेरोपॉड जातीच्या चिखलाचा आहे. अटलांटिक महासागराचा अगदीं दक्षिणेकडील भाग डायटोम जातीच्या चिखलाचा आहे. याशिवाय अधला मधला भाग निळया, तांबडया व  हिरव्या चिखलाचा व वाळूचा बनलेला आहे. कित्येक ठिकाणीं ज्वालामुखी पर्वतांतल्यासारखें व पोंवळयाच्या जातीचें द्रव्यहि सांपडते.

अटलांटिक महासागर मूळ कसा तयार झाला हा प्रश्न अद्याप सुटला नाही. बहुतेक भूस्तरशास्त्रज्ञांचें मत असें  आहे कीं अटलांटिक महासागर इतर महासागरांइतका जुना आहे. परंतु इ.सुएझ् व एम्. न्यूमेयर हे दोघे भूस्तरशास्त्रज्ञ असें मानतात कीं, पॅसिफिक महासागर हा फार जुना आहे. आणि अटलांटिक महासागरमात्र अलीकडचा द्वितीयाव-स्थाक (मेसोझोइक) युगांतला आहे. ज्यूंरीन (ज्युरासिक) काळांत अटलांटिक महासागराच्या मध्यभागाच्या आसपास आफ्रिका व दक्षिण अमेरिका यांचेमध्यें एक खंड होतें. अशाबद्दलचा पुरावा न्यूमेयरनें पुढें आणला आहे. एफ्. कॉसमॅट यानें असें दाखविलें आहे कीं, अटलांटिक महासागर सितोपल (क्रेटेशियस) कालविभागांत बहुतेक हल्लींच्या स्वरूपांतच होता.

अ ट लां टि क म हा सा ग रा च्या पा ण्या चें उष्ण ता मा न - उष्णतामानाबद्दल माहिती देतांना उत्तर अटलांटिक व दक्षिण अटलांटिक असे दोन भाग करणें सोइस्कर आहे. उष्णतामानाची मध्यरेषा म्हणजे पृष्ठभागाच्या महत्तम उष्णतेचें सरासरीनें मध्यम मान दर्शविणारी रेषा आफ्रिकेच्या किनार्‍याच्या ५  उत्तर अक्षांशापासून निघून त्या अक्षांश रेषेच्या जवळून चाळीस पश्चिम रेखांशापर्यंत जाते. व पुढें उत्तरेकडे वळून कॅरिबियन समुद्राकडे जाते. ह्या रेषेजवळचें उष्णतामान ८० हून थोडें अधिक असतें. तेथून उत्तरेकडे उष्णतामान हळूहळू कमी होत जातें. आणि ६० फा ची समोष्णतादर्शक रेषा ४५ उत्तर अक्षांशाच्या जवळ आढळते. यापेक्षां उत्तरेकडे गेल्यावर उष्णतामान अमेरिकेच्या बाजूपेक्षां यूरोपकडच्या बाजूला अधिक असतें. उत्तर अटलांटिक महासागरांतील वर सांगितलेलें उष्णतामान समुद्राच्या पृष्ठभागापासून ५०० पुरुष खोलीपर्यंत सारखेंच असतें. आर्टिक महासागराजवळच्या अटलांटिक महासागराच्या अगदीं उत्तरेकडील भागांत ३०० पुरुषाच्या खालीं पाण्याची उष्णता घनीभवन बिंदूहून म्हणजे ४ हून कमी असते. दक्षिण अटलांटिक महासागरांत उष्णतेचें मान आफ्रिकेकडील बाजूपेक्षां अमेरिकेकडील बाजूला अधिक असतें. ५०० पुरुष खोलीच्या खालीं समोष्णतादर्शक रेषा अक्षांश रेषांना बहुतेक सरळ समांतर गेलेल्या असतात.

खा र ट प णा :- सर्व महासागरांहून अटलांटिक महासागराचें पाणी अधिक खारट आहे. या महासागरांतील सर्वात अधिक खारट पाण्याचा भाग उत्तर अटलांटिकच्या २० आणि ३० उत्तर अक्षांशांच्या मध्यें आहे. या दोन भागांमधला भूमध्य रेषेजवळचा पाण्याचा भाग बराच कमी खारट आहे. उत्तर महासागरांत अधिकाधिक उत्तरेकडे खारटपणा कमी कमी होत गेला आहे. व त्यांतहि पूर्वकडील भागापेक्षां पश्चिमेकडील भागांतलें पाणी अधिक गोडें असतें. शिवाय पाण्याचा खारटपणा निरनिराळया ऋतूंत व निरनिराळया वर्षी कमी अधिक होत असतो. दक्षिण अटलांटिकमध्यें अधिकाधिक दक्षिणेकडे जावें तों पाण्याचा खारटपणा कमीकमी होत जाऊन महासागराच्या अगदीं दक्षिण टोंकाला पाणी बरेंच गोडें असतें.

ह वा मा न - अटलांटिक महासागरावरील वार्‍याचें भ्रमण नियमित स्वरूपाचें आहे. दक्षिण अटलांटिकमध्यें आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांच्या आकुंचित भूपृष्ठभागामुळें वारे बहुधा नेहमीं प्रमाणें वाहतात. पण उत्तर अटलांटिकमध्यें हवेचा दाब निरनिराळया ठिकाणीं निरनिराळा आहे व त्यामुळें वाराहि कमीजास्त प्रमाणांत वाहाण्याचा संभव आहे. तरी यांत भूप्रदेशविस्तार अतिशय असून तीन्ही बाजूंनीं महासागर बर्फानें परिवेष्टिलेला आहे त्यामुळें वार्‍यांचें बरेंच नियंत्रण होतें. '' उत्तर अटलांटिक प्रत्यावर्त '' बराच मोठा असून, हिंवाळयापेक्षां उन्हाळयांत त्याची गति जास्त असते.

प्र वा ह - वरील वातावरणीय हालचालींत व्यापारी वारे मात्र धिमे असतात व त्या योगानें पृष्ठभागाच्या पाण्याला गति देण्यांत ते मोठा भाग उचलतात. वस्तुत: हे व्यापारी वारे विषुववृत्तीय प्रवाह उत्पन्न करितात. अटलांटिक महासागरामधील सुप्रसिध्द प्रवाह म्हणजे '' गल्फ स्ट्रीम '' उर्फ आखात प्रवाह होय. या प्रवाहाची रुंदी सुमारें १०० मैल, खोली ६ शें ते १५ शें फूट असून उष्णतामान सरासरी ७९ असतें. वेग ताशीं ४।५ मैल असतो. याचा संचार फार मोठा आहे व फांटेहि अनेक आहेत.

अटलांटिकमध्यें पृष्ठभागाखालून जाणारेहि प्रवाह आहेत. ज्या ठिकाणीं वर '' गल्फस्ट्रीम '' सारखे प्रवाह असतात तेथें हे शीत प्रवाह बरेच खालून वाहातात. ही अधोगति कांहींत स्पष्ट दिसून येते; उदाहरणार्थ यूरोपीय-आफ्रिकन बाजूला १००० पुरुषपर्यंत ही गति पाहातां येणें शक्य असतें. नार्वेजियन समुद्राचे खालील थर बर्फासारखे थंड असणार्‍या आर्टिक महासागराच्या पाण्याचे आहेत. उत्तर अटलांटिक आर्टिक भागापासून तोडल्यासारखा असल्यानें, व त्याची खालवर गति जोराची असल्यामुळें, ही अधोगति त्यांत दिसून येत नाहीं, पण उलटपक्षीं दक्षिण अटलांटिकमध्यें, दक्षिण महासागराशीं त्यांतील पाण्याचा सरसहा संबंध येत असल्याकारणानें, अंटार्टिकचें पाणी विषुववृत्त व त्याहि पलीकडे आढळून येतें.