विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजीगर्त - भृगुकुलोत्पन्न एक ब्राह्मण. यास, शुन:पुच्छ,शुन:शेप, शुनोलांगूल, असे तीन पुत्र होते. त्यांतील मध्यम पुत्र शुन:शेप त्यास, यानें, वरुणास बलि देण्याकरितां हरिश्चंद्रराजास विकलें ( शुन:शेप पहा; हरिश्चंद्र पहा );

२ (अज्यै गमनाय गर्तं अस्य) ज्याला जाण्याला बीळ आहे असा-साप