विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अठ्ठाविशी - ( आठ्ठावीस्सी ) अठ्ठाविशी किंवा अठ्ठावीस महाल हें नांव ( अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत ) तापी नदीच्या दक्षिणेकडील गायकवाडाच्या वांटयाच्या अठ्ठावीस परगण्यांस लावण्यांत येत होतें. यांना सुरत अठ्ठाविशी म्हणत. इ. स. १७८० मध्यें फत्तेसिंह गायकवाडानें हा भाग इंग्लिशांस दिला. [ ग्रांटडफ व बाँबे गॅझेटियर ].