विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अचल - दुर्योधनाचा मामा. शकुनीचा भाऊ. वृषक आदिकरून आपल्या पन्नास बंधुसहवर्तमान भारती युद्धांत अर्जुनाच्या हातून मरण पावला. पुत्रदर्शनपर्वांत इतर लढाईंत पडलेल्या योद्ध्यांबरोबरच याचेंहि धृतराष्ट्र गांधारीला व्यासांनीं दर्शन करवून दिलें आहे ( महाभारत ७.३० १५.१५,३२८७९ )
२. विष्णु सहस्त्रनामांपैकीं एक.