विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अदाना : आशिया मायनरच्या आग्नेयीस हा एक तुर्की राज्याचा भाग आहे. यांतच प्राचीन सीलीशियाचा समावेश होतो. येथें खनिज संपत्ति फार आहें. हें एक इतिहासप्रसिद्ध व लष्कराच्या द्दष्टीनें फार महत्त्वाचें ठिकाण आहे. येथें खलीफ हरुन अलरशिद यानें बांधिलेल्या इमारती अजून द्दष्टीस पडतात. हें रोमन लोकांचे महत्त्वाचें लष्करी ठाणें होतें.