विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतशयन :- त्रावणकोर येथील विष्णूचें स्थान. येथें १४ हात लांबीची विष्णूची मूर्ति शेषावर निजलेली असल्या कारणानें या स्थळास हें नांव पडलें आहे. आनंदगिरीनें आपल्या शंकरविजयांत असें लिहिलें आहे कीं, भगवत्पूज्यपाद श्रीमच्छं-कराचार्य येथें दिग्विजय करीत फिरत आले आसतां या स्थळीं देवदर्शन करून एक महिनापर्यंत राहिले होते व येथें त्यांस उपनयनादिसंस्कारहीन असे विष्णुशर्मादिक साहा प्रकारचे वैष्णव आढळले होते. तेव्हा आचार्यांनीं त्यांस बोध केला व पुन: ब्राह्मण्यांत आणिलें. पेशवाईंत सुद्धां या देवस्थानाविषयीं पूर्ण माहिती असून, त्यावेळच्या एका पत्रांत त्याचा उल्लेखहि आहे.