विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अझीमगंज :- हें गांव बंगाल प्रांतात, मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्यें भागीरथीच्या उजव्या तीरावर आहे. दुसर्‍या तीरावर असलेल्या जिआगंज सुद्धां याची लोकसंख्या सुमारें तेरा चवदा हजार आहे. नलहटीपासून येथपर्यंत १ रेलवेचा फांटा आलेला आहे. येथें व्यापार बराच चालतो. अझीमपूरपासून बर्‍हाणपूर ( बंगाली ) पर्यंत लहान बोटी चालू असतात. येथील म्युनिसिपालिटीचें उत्पन्न १९०३-४ मध्यें, १६००० रु. होतें.