विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकोट तालुका - जिल्हा अकोला. उ.अ.२०' ५१' ते २१० १६' व पू.रे. ७६० ४६' ते ७७० १२' या तालुक्तांत एकंदर २६४ खालसा आणि २ जहागिरीचीं गांवें आहेत. उत्तर दक्षिण लांबी सरासरी २६ मैल; आणि रूंदी २० मैल. उत्तरेस उमरावती जिल्ह्यांतील मेलघाट तालुका; दक्षिणेस पूर्णा नदी व पलीकडे बाळापूर आणि आकोला तालुका; पूर्वेस उमरावतील जिल्ह्यांतील दर्यापूल तालुका; पश्चिमेस बुलढाणें जिल्ह्यांतील जळगांव तालुका. तालुक्यांतील प्रदेश बहुतेक सपाट असून जमीन खोल, काळी व सुपीक आहे. परंतु उत्तरेकडील सुमारें ६।८ मैल रूंदीचा प्रदेश दगडाळ आहे. तालुक्यांत पाण्याची टंचाई आहे. विहिरींतील पाणी बहुधा खारट असतें. कांही ठिकाणीं झर्याचें पाणी दोन मैलांवरुन आणावें लागतें. तालुक्यांतील रस्ते चांगले आहेत. तालुक्यांतील आठवड्याचें बाजार एकंदर १४ असून अकोट, मुंडगांव आणि मालेगांव येथील बाजार महत्त्वाचे आहेत. या तालुक्यांत देवळें वगैरे फार असून बहुतेक ठिकाणीं वार्षिक यात्रा भरतात. (अकोला डिस्ट्रीक्ट ग्याझेटीयर )