विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अटलांटिक सिटी - हें अटलांटिक काउंटीचें मुख्य स्थान संयुक्त संस्थानांतील न्यूजरसी संस्थानांत आहे. लोकसंख्या सुमारें अठ्ठावीस हजार. यांपैकीं सुमारें सातहजार नीग्रो होते. संयुक्त संस्थानांत हें हवा खाण्याचें ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. व येथे उत्तम उपाहारगृहें आहेत. येथें फिरण्याकरितां उत्तम रस्ते अटलांटा सीटी हास्पिटलसारखीं रुग्णालयें व दुसरीं सोईचीं वसतीस्थानें अनेक आहेत.