विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अधेवाड - भावनगरच्या दक्षिणेस अजमासें तीन मैलांवरचें मालेश्वरी नदीच्या (काठेवाड) उत्तर तीरावरील गांव. लोकसंख्या सुमारें पांचशें. येथील जाजदिया हनुमानाचें देऊळ व गुरुचेलानी पादुका यांचेमुळें या ठिकाणाला बरेंच महत्त्व आलें आहे. हें स्थान सोमनाथाच्या यात्रेंतील एक क्षेत्र आहे. ठाकोर रामदासजींनीं आपला पुत्र साधुलजी यास दिलेलें हें गांव असून, त्याच्या वंशाकडे तें चालत आहे. (मुं. गॅ. ८).