विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अदिलाबाद ( एदलाबाद ) तालुका.– हैद्राबाद संस्थानांतील त्याच नांवाच्या जिल्ह्यांतील एक तालुका. याचें क्षेत्रफळ २२२० चौरस मै. इ. स. १९०१ मध्यें लोकसंख्या ११२३१४ तीच इ. स. १८९१ मध्यें फक्त ९९३३२ होती. या तालुक्यांत एक एदलाबाद शहर (वस्ती ७२०१) व ४२० खेडीं आहेत. त्यांत एदलाबाद हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे. ३० खेडीं जहागिरीदाखल आहेत. इ. स. १९०१ मध्यें उत्पन्न १ २/५ लाख होतें. येथें लोकवस्ती फार विरळ आहे व पुष्कळ जमीन पडीत आहे.  ( इं. गॅ. ५ )