विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अज (१) - परमेश्वरनाम. नहि जातो न जायेऽहं न जनिष्ये कदाचन । क्षेत्रज्ञ: सर्व भूतानां तस्मादहमज: स्मृत: ॥
- महाभारत.
(२) प्रियव्रत वंशी ऋषभदेव कुलांत जन्मलेला जो प्रतिहर्ता नावाचा राजा त्याला 'स्तुति' नांवाच्या बायकोपासून झालेल्या दोन पुत्रांतील ज्येष्ठ.
(३) एक ऋषि, व त्याचें कुल.
(४) रघूचा मुलगा, याची पत्नी इंदुमति; अजविलाप नांवाचा रघुवंशाचा भाग मोठा रसाळ आहे.
(५) (विदेह वंश) ऊर्ध्वकेतु नावाचा जनकाचा पुत्र व पुरुजित् जनकाचा बाप.
(६) सोमवंशी विजयकुलात्पन्न जन्हुराजाचा पुत्र जो पुरु राजा त्याचें नामांतर.
(७) भारती युद्धांतील एक पांडव पक्षीय राजा
( भारत उद्योगपर्व अ. १७१ )